७ डिसें, २०२०

"Introduction to Science."

Introduction to Science

  • Science is Knowledge.
  • Science is searching for reality.
  • Science is Specific and systematic knowledge.
  • Science is the systematic study of the mystery of nature.

या वरील सर्व व्याख्या (Definitions) तुम्हाला शाळेत किंवा कॉलेजेस मध्ये शिकायला मिळाल्या असतीलच. पण, बहुदा या व्यतिरिक्त तुम्हाला Science (विज्ञान) बद्दल जास्त माहिती कोणी सांगितली नसेल. तर मित्रांनो आम्ही आहोत Scire N Tech आणि आम्ही आज तुम्हाला विज्ञान (Science) संबंधित खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहोत जसे कि, विज्ञान म्हणजे काय?, त्याचा उगम, त्याचा इतिहास इत्यादी.  


The Beginning

Source: Dark Web-series From Netflix

आपण सर्वप्रथम पाहुयात कि, Science (विज्ञाना) ची सुरुवात नक्की झाली कोठून? 
हा प्रश्न खूप विचारात टाकणारा आहे, परंतु याच उत्तर खूपच सोपं आहे, विज्ञानाची सुरुवात हि खूप जुनी आहे i.e. बिग बँग च्या अगोदर पासून. परंतु, इथे एक प्रॉब्लेम आहे तो असा कि, आपण इथे पृथ्वी बद्दल बोलत आहोत.

Which we don't even know that this world exists in reality or not.
                                                                        - Quantum Mechanics

Science (विज्ञाना) ची सुरुवात हि पुरातन ग्रीस मध्ये साधारणतः ६व्या शतकात झाली होती. आता हा प्रश्न आपणास नक्की पडेल कि याची सुरुवात कोणी केली. या प्रश्नाचं उत्तर यावर अवलंबून आहे कि आपण हा प्रश्न कोणास विचारतो. कारण, जसे कि आपणास आम्ही सांगितले कि विज्ञानाची  सुरुवात खूप जुनी आहे, त्यामुळे आपणाला याच एक निश्चित उत्तर नाही मिळणार. काही लोकां अनुसार विज्ञानाची सुरुवात Aristotle ने केली होती. परंतु, Aristotle नुसार विज्ञानाची सुरुवात Thales आणि Anaximander यांनी केली होती.

Did you know: Aristotle was the Tutor of Alexander- The Great.

आता आपण पाहुयात कि "Science" (विज्ञान) हा शब्द कोठून आला आहे?

परंतु या अगोदर आपणास हे जाणून घेणे गरजेचे आहे कि, Science (विज्ञाना)ला पुरातन काळी "Natural Philosophy" तर वैज्ञानिकांना "Natural Philosophers" या नावाने जाणत असत. 

विज्ञान शब्दाची उत्क्रांती: "Science" (विज्ञान) हा शब्द "Scientia" या लॅटिन शब्दापासून आला आहे. Scientia हे एक नाऊन आहे. समजा आपण या शब्दाचा इंग्रजीत शब्दशः अर्थ पाहिला तर "ज्ञान" (Knowledge) असा होतो. तर आपण विज्ञानाची व्याख्या "Science is Knowledge" असे म्हणु शकतो का? माझे उत्तर असेल नाही. याचे कारण आपण पुढे पाहुयात. त्या अगोदर आपण हे जाणून घेतले पाहिजे कि, "Scientia" हा शब्द Scire या लॅटिन शब्दापासून आला आहे. Scire या शब्दाचा अर्थ "To Know" म्हणजेच "माहिती करुन घेणे" असा होतो.
     

Modern Science


आपण पाहिलेल्या वरील सर्व गोष्टी Classical Science संबंधित होत्या. आता आपण "Modern Science" बद्दल बोलूयात. आणि आता याचा उच्चार झालाच आहे तर आपणास सांगू इच्छितो कि "Galileo Galilei" (गॅलिलिओ गॅलिली) ज्यांनी टेलिस्कोपचा आविष्कार केला, त्यांना "Father of Modern Science", "Father of Modern Physics" आणि "Father of Visible Astronomy" म्हणले जाते. 

इसवी सन १६६० मध्ये एका महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. "College for the promoting of the physio-mathematical experimental learning" असे त्याचे नाव होते. या महाविद्यालयाचे काम होते विज्ञान संबंधित गोष्टींच्या मिळालेल्या पुराव्यांना साक्ष असणे, म्हणजेच पुराव्यांचे witnessing करणे. या सर्व गोष्टींचा रेकॉर्ड "Philosophical Transactions" या जर्नल मध्ये लिहून ठेवले जात असे. असे मानले जाते कि, हि जगातली सर्वात जुनी वैज्ञानिक जर्नल आहे.

३ वर्षानंतर म्हणजेच १६६३ मध्ये या महाविद्यालयाची पुनःस्थापना करण्यात आली. ज्याला आपण आज "The Royal Society" च्या नावाने ओळखतो. याच पूर्ण नाव आहे "The Royal Society of London for Improvement of Natural Knowledge." आणि ह्यांचे एक लॅटिन बोधवाक्य आहे "Nullius in Verba" म्हणजेच "कोणावरही नाही" असे आहे. याचा अर्थ पूर्णपणे असा होतो कि, 

एखाद्याने हे खरे असल्याचे सांगितले म्हणून कशावरही विश्वास ठेवू नका. प्रत्येक नवीन गृहीतक परीक्षण करा, किंवा शिक्षित स्वतःचा अंदाज घ्या.

Don't believe something just because someone tells it's true. Test out each new hypothesis, or educated guess yourself.


What is Science? 

विज्ञानाची "Science is Knowledge" हि व्याख्या पूर्णपणे बरोबर नाही. कारण इथे एक गोष्ट विचारात टाकणारी आहे, ती अशी की विज्ञानात असे काही सिद्धांत सापडतात ज्यांची ठोस उत्तरे अजून विज्ञानाकडे सुद्धा नाहीत. उदा. The Big Bang Theory (द बिग बँग थेअरी), Theory of Evolution (थेअरी ऑफ इव्होल्यूशन) ईत्यादि. आणि knowledge चा अर्थ "वास्तवाची भावना" म्हणजेच "Feeling of Reality" असा होतो. या कारणामुळे ही व्याख्या पूर्णपणे बरोबर नाही. तर मग विज्ञानाला कसे परिभाषित करू शकतो? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाले तर,

विज्ञान हे आपल्या निरीक्षणाचे निष्कर्ष आहे. 

                                   किंवा

विज्ञान म्हणजे निसर्गाची आत्म-जागरूक चौकशी होय. 


विज्ञानाचे सुद्धा बोधवाक्य आहे ही गोष्ट खूप क्वचितच लोकांना माहिती असेल. 

जटिल तथ्यांचे साधे स्पष्टीकरण शोधणे हे विज्ञानाचे उद्दीष्ट आहे. 

The aim of science is to seek the simplest explanations of complex facts.


 Classification of Science:

साधारणतः आपण विज्ञानाला दोन भागांमध्ये वर्गीकृत करतो. एक मूलभूत विज्ञान आणि दुसरे व्यावहारिक विज्ञान. सर्वप्रथम आपण मूलभूत विज्ञान पाहुयात. तर, मूलभूत विज्ञान हे नेहमी चक्रा (Cycle)चे अनुसरण (Follow) करते म्हणजेच एका loop (कधीही न संपणारी पळवाट) मध्ये चालते. 

Basic Science (मूलभूत विज्ञान):

  • Observation (निरीक्षण): या सायकल मध्ये सर्वप्रथम येते निरीक्षण. म्हणजेच आपल्या आजूबाजूच्या  निसर्गात घडणाऱ्या गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करणे.

  • Curiosity (कुतूहल): या चक्रातील दुसरा टप्पा आहे आपल्यामधल्या जिज्ञासू वृत्तीला जागृत करणे आणि आपण केलेल्या निसर्गातील निरीक्षणांवर प्रश्न करणे.इथे आपल्याला मुख्यतः काय, का, आणि कसे हे तीन मूलभूत प्रश्न विचारावे लागतात आणि याचे उत्तर देखील आपल्याला मिळते. कारण, विज्ञानाला फरक नाही पडत की तुम्ही कोण आहात, कोठून आला आहात, तुमचे शिक्षण काय आहे, आणि हीच विज्ञानाची सर्वात मोठी शक्ती आहे. जर आपणाकडे पुरेसे पुरावे असतील आपणदेखील वैज्ञानिक बनू शकता.



  • Assumptions/Hypothesis (गृहीतके): गृहीतके या चक्रातील दुसरा टप्पा आहे. आपण आपल्या आसपासच्या केलेल्या निरीक्षणांसाठी (Assumptions) गृहीतके मांडणे, म्हणजेच आपण केलेल्या क्रियेचा एखाद्या गोष्टीवर काय परिणाम होऊ शकतो यासंबंधित गृहीतके मांडणे.



  • Experimentation (प्रयोग): Series of experiments म्हणजेच प्रयोगांची मालिका हे या चक्रातील चौथा टप्पा आहे. आपल्या गृहीतकांची पडताळणी करण्यासाठी प्रयोग/चाचणी करणे.



  • Conclusion (निष्कर्ष): निष्कर्ष हे या चक्रातील शेवटचा टप्पा असतो. अगोदरच्या टप्प्यातील केलेल्या चाचण्या/प्रयोग यातून आलेल्या परिणामांचे आकलन करून त्यांचे निष्कर्ष काढणे. मिळालेले निष्कर्ष आणखी प्रश्नांना जन्म देतात, आणि विज्ञानाचे हे चक्र असेच चालू राहते.



Applied Science (व्यावहारिक विज्ञान):
        Applied Science (व्यावहारिक विज्ञान) बद्दल सांगायचे झाले तर, हे पूर्णपणे मूलभूत विज्ञानावर अवलंबून असते. व्यावहारिक विज्ञान म्हणजे जे आपणास मूलभूत विज्ञानाद्वारे अगोदरपासून माहिती आहे त्याचा वापर इथे होतो. Applied Science (व्यावहारिक विज्ञान) हे सरळ सरळ तंत्रज्ञानाशी जुळलेले आहे. 



विज्ञानविषयीचा हा लेख तुम्हाला कसा वाटलं हे नक्की खाली कंमेंट करून सांगा.
आपण आपले suggestion सुद्धा खाली कंमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubts, Please let me know.